5-year-old boy injured in car collision at Zarebamber
दोडामार्ग : प्रतिनिधी : बेळगावहून दोडामार्गच्या दिशेने जाणार्या इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत परप्रांतीय ५ वर्षांचा मुलगा जखमी झाला. झरेबांबर तिठ्यानजीक मुलगा रस्ता ओलांडत असताना इनोव्हा कारने मुलाला जोरदार धडक दिली. यात प्रकाश पोवार या ५ वर्षीय मुलाच्या तोंडाला जबर दुखापत झाली. सदर इनोव्हा कार चालकाने जखमी मुलाला तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास रेडकर यांनी प्राथमिक उपचार केले. सदर मुलावर अधिक उपचार सुरु आहेत.












