कोल्हापूर येथे होणाऱ्या 68 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून लांज्यातील दोघांची नियुक्ती

लांजा (प्रतिनिधी) कोल्हापूर येथे होणाऱ्या 68 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील पांडुरंग पेडणेकर आणि आकाश सोळंके या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलणाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषद मार्फत 68 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे दि.9 ते 13 जानेवारी या कालवधीत आदर्श गुरुकुल विद्या. व जुनि. कॉलेज पेठ वडगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील पांडुरंग पेडणेकर आणि आकाश सोळंके यांची या स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
या निवडीबद्दल पांडुरंग पेडणेकर आणि आकाश सोळंके यांच्यावर तालुक्याच्या क्रिडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.