महाशिवरात्रीनिमित्त काशीविश्वेवर मंदिरात विविध कार्यक्रम

कणकवली : शहरातील श्री देव काशीविश्वेवर मंदिरात बुधवार २६ फेब्रुवारीला महाशिवरात्र विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, अभिषेक, ९ वा. लघुरुद्र, रात्री ९.३० वा. श्रींची मंदिराभोवती पालखी मिरवणूक, १०.३० वा. ह.भ.प. किरण पारकर यांचे कीर्तन होईल. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.