मंडणगड नगरपंचायतीवरही लवकरच शिवसेनेचा भगवा फडकणार – गृहराज्य मंत्री योगेश कदम

मंडणगड | प्रतिनिधी – विकासाच्या वाटेवर नगरपंचायत अग्रेसर होण्यासाठी परिवर्तन करत, लवकरच मंडणगड नगरपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा फडकण्याचे संकेत राज्याचे गृहराज्य मंत्री आमदार योगेश कदम यांनी दिले. 18 फेब्रुवारी 2025 रोजी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवसेना मंडणगड यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या स्वागत समारंभात ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मंडणगड शहराचा सर्वांगीण विकासाकरिता अग्रक्रम दिलेला आहे. शहरातील पायाभुत सुविधांसह प्रभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत आहे. प्रभागाचे पायाभूत सुविधांकरिता राज्यशासनाकडून भरघोस विकास निधी मिळवून दिला आहे. यावेळी महायुतीचा नगराध्यक्ष सत्तेत बसणे गरजेचे आहे, त्यामुळे नगरपंचायतीचे विकासास आणखीन गती मिळणार आहे असे म्हणाले.

 

राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे वरचष्मा राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमात नगरसेवक सुभाष सापटे यांच्या पत्नी सौ. शुभदा सापटे, नगरसेविका सौ. समृध्दी शिगवण, यांचे पती शैलेश शिगवण, नगरसेविका राजेश्री सापटे यांचे पती दीनेश सापटे, नगरसेवक मुकेश तलार यांचे वडील अनंत तलार या नगरसेवकांच्या निकटवर्ती नातेवाईकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीचे सत्ता बदलाची चर्चा शहरात पुन्हा एकदा सुरु झाली आहे. नगरपंचायतीत काठावरचे बहुमतात महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजीत पवार गट सत्तेत असला तरी विकास कामांचे प्रश्न व निधीचे असमान वितरणावर नगरसेवकांमधील नाराजाचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यातच मंत्र्यांनी सत्ताबदलाचे व्यासपिठावरुन जाहीर सुतोवाच केल्याने आगामी काळात नगरपंचायतीचे सत्ताकारणात वेगवान घडामोडीची शक्यता आहे. स्वागत समारंभास शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी सभापती आदेश केणे, संदेश चिले, शहरप्रमुख विनोद जाधव, नगरसेवक योगेश जाधव, मुश्ताक दाभिळकर, आदेश मर्चंडे, अनंत लाखण, अनिल रटाटे, इरफान बुरोंडकर. माजी सभापती अमिता शिंदे, विभागप्रमुख दीपक मालुसरे, राजाराम लेंढे, अस्मिता केंद्रे, प्रतिक पोतनीस, विकास पवार, राहूल पारेख, आनंद भाटे, यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महसुल, पोलीस, सार्वजनीक बांधकाम, शिक्षक, ग्रामसेवक, अशा विविध विभागातील प्रशासकीय अधिकाऱी व नागरीकांनी योगेश कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.