माखजन | वार्ताहर : १४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २०% वेतन अनुदान तात्काळ मिळावे यासाठी राज्यमंत्री योगेशदादा कदम यांची भेट घेतली.भेटीदरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या.
पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी जून २०२४ पासून अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २०% वेतन अनुदान दिले जाईल असे घोषित केले होते.नंतरच्या काळात १० ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ११०० कोटी रुपये इतक्या निधीला मंजुरी देत,२०% वाढीव टप्पा वेतन अनुदान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.संबंधीचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ ला जारी करण्यात आला.शासन निर्णयाला अनुसरून व तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणेप्रमाणे जून २०२४ पासून चा वाढीव २०% वेतन अनुदानासाठी लागणारा निधी या अर्थसंकल्पात मजूर व्हावा यासाठी मंत्री योगेशदादा कदम यांनी विशेष प्रयत्न करावेत यासाठी अंशतः अनुदानित शिक्षकांनी भेट घेतली.अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये प्रा.सौ समृद्धी भुवड.,प्रा.सौ. स्वाती खेडेकर,प्रा. श्री.बाजीराव चव्हाण ,प्रा.श्री. विजयराजे दळवी
प्रा.श्री. नंदकुमार गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी योगेशदादा कदम यांनी याविषयीचा योग्य तो पाठपुरावा करतो असे सांगितले











