वेळागर : वेळागर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाऊ उर्फ महादेव आंदुर्लेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या आनंदाच्या सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी, ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदुर्लेकर यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेळागर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्वपूर्ण योगदानाची सर्वांनी दखल घेतली.

यावेळी गावातील वरिष्ठ नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यासोबतच शेतकरी बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या शेवटी महादेव आंदुर्लेकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि शेतकरी हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटत राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण आनंदी आणि उत्साहपूर्ण होते.










