संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जागर संविधानाचा

शिवस्मृती प्रतिष्ठान सहाणवाडी चाफेरी या संस्थेच्या माध्यमातून जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरा होणारा जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.त्यामध्ये *शिवस्मृती प्रतिष्ठान व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफेरी नं.१* यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त *हरघर संविधान* या उपक्रमांतर्गंत *जागर संविधानाचा* कार्यक्रम साजरा करताना मुलांना क्रांतिकारकांचे व पारंपरिक वेशभूषा करून ढोल – ताशांच्या गजरात, संविधान गीताच्या निनादात, घोषणाच्या जयजयकारात संविधान रॅली गावातून काढण्यात आली. त्यानंतर प्रतिमा पूजन, संविधान पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर शिवरायांबद्दल स्फृती व प्रेरणा देणारे गीत म्हटले. त्यानंतर प्रमुख वक्ते सन्मा.अंकलगे सर यांनी संविधानावर प्रबोधनात्मक विचार मांडताना संविधानाची प्रास्ताविका समजून सांगितली..तद्प्रसंगी चाफेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सन्मा.अंजली कांबळे, प्रतिष्ठान अध्यक्ष श्री रमेश सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.स्वरा पवार, उपाध्यक्ष सौ.रिना पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमित पायरे,सौ.शामल पवार,सौ.अमिता बैकर शाळेतील शिक्षक श्री.संतोष जाधवसर , शाळा चाफेरी नं.२चे शिक्षक श्री.सुभाष तांबेसर, पत्रकार श्री.संकेत ढवळे , मुंबई क्राईम पोलिस अधिकारी श्री.पायरे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व सदस्य, महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, तसेच अंगणवाडी सेविका सौ.उज्वला पवार, मदतनीस सौ.पवार, आशा सेविका सौ.साक्षी कांबळे शालेय पोषण आहार कर्मचारी सौ.नयना पवार, मदतनीस श्रीम.स्नेहा पवार आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने व मुख्याध्यापक श्री.तुकाराम वासावे यांच्या नेतृत्वाखाली श्री.संतोष जाधव व सौ.प्रज्ञा वाघोदे यांच्या संयोजन व नियोजनातून आणि शिवस्मृती प्रतिष्ठान आयोजनातून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.तसेच मेकअप व वेशभूषा करण्यासाठी प्रतिष्ठानने मोलाचे सहकार्य केल्याबद्दल श्री.संतोष जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले व प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.आजी माजी विद्यार्थी, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर यांना धन्यवाद दिले.जयजयकारानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.