लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील कै. श्रीम. जानकीबाई (आक्का) तेंडुलकर महिलाश्रम लांजा या संस्थेच्या मुलींचे निरीक्षण गृह /बालगृह या विभागाला महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्या वतीने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला .
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्याकडून बालस्नेही पुरस्कार २०२४ या पुरस्काराकरिता उत्कृष्ट निरीक्षण गृह /बालगृह या नामांकन प्रकारात लांजा महिलाश्रम संस्थेच्या मुलींचे निरीक्षण गृह /बालगृह या विभागाला कोकण विभागातून उत्कृष्ट निरीक्षण गृह /बालुगृह म्हणून बालस्नेही पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
सदर पुरस्काराचे वितरण नुकतेच यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट ,मुंबई येथे पार पडले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्याच्या
महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, श्रीमती मेघना बोर्डीकर ( राज्यमंत्री,महिला व बालविकास) तसेच बाल हक्क आयोग यांचे अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते संस्थेला सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.










