वरवेली येथील श्री हसलाई देवी देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नमन कलाकारांचा सत्कार….

मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला.वरवेली येथील श्री हसलाई देवी, खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री हसलाई देवीच्या सहाणेवर शिमगोत्सव निमित्त नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, दिग्दर्शक जगन्नाथ शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, मधूकर बारगोडे, अनिल अवेरे, वसंत पांडूरंग आगरे, नंदकुमार गावडे, अनंत शिंदे, रमेश आगरे, संतोष अवेरे, राजेंद्र भुवड, मधुकर बारगोडे, रघुनाथ शिंदे, दत्ताराम रावणग आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कार कार्यक्रमांमध्ये पुढील कलाकारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये वसंत सोनू आगरे, वसंत रामचंद्र आगरे, संदीप शिंदे, विवेक रावणंग, विनोद शिंदे, विकास शिंदे, रुपेश तेलगडे, गणेश शिंदे, पंकज आगरे, संजय शिंदे, राहुल भुवड, सुशांत गावडे, ओमकार भुवड, संदीप आगरे, सुशील गावडे, निलेश रावणंग, अशोक धुमक, विकास रावणंग, सागर आगरे, महेश आगरे, चंद्रकांत शिंदे, तेजस शिंदे, गीतकार सचिन आग्रे, महेंद्र अवेरे, अविनाश अवेरे, प्रमोद धोंडू आगरे, नामदेव राणे, आशिष अवेरे आदी कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी नमन मंडळामध्ये अनेक वर्ष ही कलाकार नमन कला सादर करत आहेत, परंतु शासनाकडून मिळणाऱ्या कलाकार मानधना पासून वंचित राहू नयेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातील अनेक कलाकारांना शासनाकडून मानधन मिळण्यासाठी उपयोग होईल. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी केले.