पाल ग्रामपंचायतीला संगणक साहित्य व जिल्हा आपत्ती विभागाकडून “आपत्ती साहित्य किट” प्राप्त

वेंगुर्ले l दाजी नाईक :जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत पाल ग्रामपंचायत साठी संगणक साहित्य व प्रिंटर तसेच जिल्हा आपत्ती विभाग सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मंजूर आपत्ती साहित्य पूर्ण किट प्राप्त झाले.

यासाठी ग्रामपंचायत पाल सरपंच सौ कावेरी गावडे व ग्रामसेवक श्री चेतन अंधारी यांच विशेष सहकार्य लाभले. तसेच आपत्ती किट मिळवून देण्यासाठी वेंगुर्ला तहसीलदार श्री ओमकार ओतारी यांचे ही सहकार्य लाभले. हे सर्व साहित्य पाल सरपंच सौ कावेरी कमलेश गावडे यांनी ग्रामपंचायत पाल मध्ये ताब्यात घेतले.याप्रसंगी सरपंच सौ कावेरी गावडे व ग्रामसेवक चेतन अंधारी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मुळीक, विनिता गावडे, डाटा ऑपरेटर सुप्रिया गावडे, शिपाई सत्यविजय गावडे, पाल ग्रामस्थ श्री कमलेश गावडे, संदीप गावडे, नाना गावडे, सौ.संपदा पिंगुळकर, सौ दिव्या खरूडे आदी उपस्थित होते.