सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एच आर खन्ना हे त्यांच्या प्रामाणिकपणा, धैर्यासाठी आणि विशेषतः ‘एमडीएम’ जबलापूर ‘ प्रकरणातील निकालासाठी ओळखले जातात. केशवानंद खटल्यातील निकालाने त्यानी भारतीय लोकशाहीचे संरक्षण केले .न्या खन्ना मूलभूत हक्कांचा संरक्षणासाठी आणि राज्यघटनेच्या पवित्र्यासाठी त्यानी केलेल्या संघर्षासाठी ओळखले जातात . ऐतिहासिक निकालामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद गमवावे लागले .
न्यायाधीश अभयजी ओक यांनी या पुस्तकाला सुंदर प्रस्तावना लिहिली आहे .
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री प्रसन्नजी वराळे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .न्या वराळे १४ वर्ष मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते .कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते .अभासुवृत्ती, अफाट वाचन आणि न्यायालयीन शिस्तीकरिता ते ओळखले जातात .उत्तम वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे . आंबेडकरी विधी महाविद्यालयात प्राध्यापक त्यांनी काम केले आहे .याचबरोबर न्या मकरंद कर्णिक,न्या माधव जामदार आणि प्रधान जिल्हा न्यायाधिश सुनील गोसावी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल विवेक हॉल येथे संपन्न होत आहे. .तरी प्रकाशन समारंभास उपस्थित रहावे ही विनंती .
अॅड विलास पाटणे (रत्नागिरी)
___________________________










