रत्नागिरी :
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी आज पदभार घेतला आहे. त्यामुळे तुषार बाबर कार्यमुक्त झाले.तुषार बाबर यांनी चार वर्षे पालिकेचा कारभार सांभाळला.
रत्नागिरीचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला त्या वैभव गारवे यांच्यासमोर उभा असलेला उन्हाळा, संभाव्य पाणी टंचाई, रस्ते, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी व्यवस्थापन सह अनेक प्रश्न उभे असून ते प्रश्न नवे मुख्याधिकारी कसे सोडवणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे.












