Shirgaon-Salshi road should be replaced and widened.
वाहनचालकांची मागणी
शिरगाव | वार्ताहर : शिरगाव साळशी या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाबरोबर या रस्त्यावरील जीर्ण मो-या बदलून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी वाहन चालकांतूून मागणी होत आहे.
खारेपाटण – उंडील – ओंबळ – शिरगाव – साळशी – कुवळे – सांडवे – रामगड असा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९ आहे या मार्गावर शिरगाव साळशी या हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे
देवगड – कणकवली -मालवण या तीन तालुक्यांना जोडणारा अंतर्गत महत्त्वाचा जवळचा मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर सतत बारमाही वाहतुकीची वर्दळ असते. तसेच सार्वजनिक व खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते.
शिरगाव साळशी हा मार्ग अरुंद असून धोकादायक वळणांचा, तीव्र उतराचा रस्ता आहे. या रस्त्याचे सुरू असलेल्या डांबरीकरणाबरोबरच त्याचे रुंदीकरण करण्यात यावेत. अशी मागणी जोर धरीत आहे.
त्याप्रमाणे या रस्त्यावरील २५-३० वर्षांपूर्वीच्या मो- या अरुंद असून जीर्ण झाल्या आहेत. साईडचे संरक्षण कठडे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना या मो-या धोकादायक ठरत आहेत.तसेच या रस्त्यालगत असलेल्या दरीच्या ठिकाणी संरक्षण कठडे नाहीत. धोकादायक वळणावर सूचना फलक नाहीत. रस्त्याच्या बाजूने झुकलेली जुनाट वृक्षे अद्याप तोडलेली नाहीत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावेत. याबाबत साळशी ग्रामपंचायतीने संबधितांंना पञव्यहार केलेला आहे.
तसेच या समस्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण, आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते.माञ याकडे दुर्लक्ष केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांतून उमटत आहेत











