बांदा- दाणोली मार्गात अखेर सातूळी बावळाट शाळेसमोर गतिरोधक बसविला

ओटवणे (प्रतिनिधी) सध्या बांदा – दाणोली मार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या डांबरीकरणाचे काम सुरु असून अनेक ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असताना गतिरोधक बसविण्यासाठी सुद्धा मागणी करावी लागत आहे. या मार्गातील सातुळी आणि बावळाट शाळा या रस्त्यानजिक आहेत या

शाळेसमोरील रस्त्यावर मागणी केल्यानंतर गतिरोधक उभारण्यात आले. यासाठी एस जी फाऊंडेशन संस्थापक संदेश गांवकर यानी याची दखल घेत पालक मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले त्यानंतर तात्काळ दखल घेऊन हे गतिरोधक उभारण्यात आले त्यामुळे या भागातील ग्रामस्थांसह पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बांदा – दाणोली जिल्हा मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असून या जिल्हा मार्गालगतच्या सातुळी आणि बावळाट

शाळेसमोर गतिरोधक नसल्यामुळे येथून वाहने वाहनचालक सुसाट चालवतात यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वीही असे छोटे मोठे अपघात घडले सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे ग्रामस्थांनी अनेक वेळा लक्ष वेधले मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

बावळाट गावचे सुपुत्र असलेले तथा मुंबईस्थित एस जी फाऊंडेशनचे संस्थापक संदेश गांवकर यानी याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले आणि प्रशासनाला जाग आणून दिली यावर त्वरीत कार्यवाहीची मागणी केली. त्यानंतर याची तात्काळ दखल घेऊन सातुळी आणि बावळाट या दोन्ही शाळेसमोर गतिरोधक उभारण्यात आले. यावेळी भास्कर परब, बाबु सावंत, सुरेश कदम, अरूण गांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेसमोरील गतिरोधकाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पालकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.पालकमंत्री नितेश राणे यांसह एस. जी. फौंडेशन चे संस्थापक संदेश गावकर यांचेही आभार मानले