ग्रामपंचायतीचा कानाडोळा
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडून गंभीर दखल
वाहनांवर कारवाईचा बडगा
खेड(प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील मरणे येथील काळकाई मंदिरासमोरील छोटा मंदिर परिसर वाहनतळ बनत चालला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने सर्रासपणे उभी केली जात असल्याने वाहनांचा धोका कायम आहे. ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने याठिकाणी वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
तमाम भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या काळकाई देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्थेसाठी काळकाई मंदिर व्यवस्थापनाने मंदिरासमोरच प्रशस्त जागेत व्यवस्था केली आहे. काळकाई मंदिरासमोरील
महामार्गालगत देवीचे छोटे मंदिर आहे. या मंदिरातही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तितकीच असते. मात्र, मंदिराच्या दोन्ही बाजूला रस्त्यातगत अवजड वाहने उभी केली जात आहेत.
डम्पर, खासगी आरामबस, ट्रक व अन्य वाहने सर्रासपणे उभी केली जात असल्याने अन्य वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होत आहे महामार्गावरून धावणारी वाहने वेगाने धावत असतात. यामुळे याठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय भाविकांना पोका पोहचण्याचा दाट संभव आहे. रस्त्यालगत सर्रासपणे उभी केली
जाणारी वाहने हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहनचालकांचे फावत आहे.
गतमहिन्यात येथील पोलीस निरीक्षक भोयर यांनी भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमणे हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा करत वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणला आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा कोंडलेला ‘श्वास’ मोकळा झाला आहे. मरणे परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना देखील पोलीस निरीक्षक नितीन भोपर पांनीच थेट पुढाकार घेत अतिक्रमणे हटवून बेशिस्तपणे रस्त्यालगत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनचालकांनाही दणका दिला होता.
यापाठोपाठच भरणे येवीत उड्डाण पुलावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भरणे येथील छोट्या काळकाई मंदिरासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांबाबत केलेल्या तक्रारीचीही पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात ५ ते ६ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे सांगण्यात आले.










