ओटवणे (प्रतिनिधी ) बांदा – दाणोली मार्गात विलवडे येथे MH 12 XM 1263 आयशर टेम्पो चा अपघात झाला असून या भागात अपघात होण्याच्या मालिकेला सुरुवात झाली. ही घटना बुधवारी रात्री 7 च्या सुमारास घडली टेम्पो चालक आपल्या ताब्यातील गाडी घेऊन गोव्यातून बांदा मार्गे कोल्हापूर दिशेने जात होता अचानक समोरून येणाऱ्या वाहनाने हूल दिल्याने टेम्पो चालकाने गाडी बाजूला वळवीला या वेळी गाडी थेट क्लीनर च्या बाजूने झाडाला धडकली. बांदा येथून विलवडे येथे येणारे विलवडे येथील दोघे जण क्लीनर सीट वर बसले होते दैव बलवत्तर म्हणून या दोघांचे प्राण वाचले. घटना समजताच विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी घटना स्थळी धाव घेतली.या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा रस्ता आधीच अरुंद त्यात पावसाचे पाणी दोन्ही बाजूनी थेट रस्त्यावर असते त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे या परिसरात दरवर्षी पावसात अपघात होतात.ही समस्या आता दरवर्षीच झाली असल्याने यावर उपाय योजना करावी अशी मागणी वाहन चालक ग्रामस्थ करीत आहेत त्यातच सध्या या रस्त्याचे रुंदीकरण काँक्रेटीकरण काम सुरु असल्याने वाफोली परिसरात रस्ता ही पुर्ण निसरडा चिखलमय झाला आहे.त्यामुळे चिखल मय रस्त्यातून वाहन हाकावी लागतात यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.











