मिरकरवाडा येथे 30 हजार रुपये किमतीचा गांजा पकडला

शहर पोलिसांनी एका इसमास घेतले ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी मिरकरवाडा येथे गांजाचे झुरके ओढणाऱ्याला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

५ जूनच्या रात्री शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना साधारण ९ वाजण्याच्या दरम्यान मिरकर वाडा परिसरात स पथक गस्त करीत असताना, पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या उत्तर दिशेस सुमारे 50 मिटर अंतरावर मोकळ्या मैदानात रात्री 21.04 वा. च्या सुमारास एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. शिताफीने पोलिसांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगझडती मध्ये एक पांढऱ्या रंगाची पिशवी व त्यात एकूण 14 लहान व 3 मोठ्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या मिळून आल्या व त्यात काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला.

चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित राजेंद्र चव्हाण, (वय-35 वर्षे, मुळ रा. घर नं. 1391, आंबेशेत, ता.जि. रत्नागिरी ) असे सांगितले.
आरोपी रोहित राजेंद्र चव्हाण, रा. आंबेशेत, रत्नागिरी यास ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याच्याकडून एकूण ₹ 30,000/- किमतीचा व 716 ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 238/2025 एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ४(क), 20 (ब) (ई) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही, कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर, व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
1) पो.उ.नि. श्री. श्याम आरमाळकर, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे,
2) स.पो.फौ./ श्री. दीपक साळवी,
3) पोहवा /574 श्री. अरुण चाळके,
4) पोहवा /1399 श्री. अमोल भोसले,
5) पोहवा / 1112 श्री. आशीष भालेकर,
6) पोहवा / 1447 श्री. पंकज पडेलकर
7) पो.कॉ/484 श्री. अमित पालवे.