पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आहे सदर स्पर्धा शुक्रवार दिनांक १३ जून २०२५ रोजी श्री विठ्ठलराव जोशी चारिटीज ट्रस्ट डेरवण, चिपळूण येथे आयोजित करण्यात येणार आहे.

दिनांक २१ ते २३ जून २०२५ दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत १८ वर्षावरील म्हणजेच २८ ऑगस्ट २००५ पूर्वी जन्मलेले खेळाडू पात्र ठरतील. राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यूआयडी नंबर असणे आवश्यक आहे.

डेरवण क्रीडा संकुल येथे शुक्रवार दिनांक १३ जून रोजी सकाळी ९.०० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. सर्व खेळाडूंनी ८.०० वाजेपर्यंत आपली उपस्थिती नोंदवावी. तत्पूर्वी संघटनेच्या गुगल फॉर्मवर आपला प्रवेश निश्चित करावा. स्पर्धेसाठी रुपये १०० प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. प्रवेशिका नोंदविण्याची अंतिम तारीख १० जून आहे. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांना रुपये १५० प्रवेश फी द्यावी लागेल.

पुरुष व महिला गटातील खेळाडूंना १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ५००० मी., १०००० मी., ११० मी. हार्डल्स, ४०० मी. हार्डल्स, ३००० मी. स्टिपलचेस, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भला फेक, हातोडा फेक, डेकाथलॉन, हेप्टथलॉन या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. प्रत्येक खेळाडूला किमान दोन क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल.

अधिक माहितीसाठी अविनाश पवार (८२७५६३५५३३), अजहर खलपे(९९६०६६६९७९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.