शिरगांव ( प्रतिनीधी)देवगड तालुक्यातील आरे येथील ग्रामपंचायत सभागृहात *कृषी विभाग व आत्मा, देवगड व कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस* यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२५ व *विकसित कृषी संकल्प अभियान २०२५* अंतर्गत शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. भास्कर काजरेकर सरांनी या *विकसित कृषी संकल्प अभिनयाचा उद्देश, संकल्पना विषयी प्रस्तावित केले*व कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मत्स्य संवर्धन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ ब्राह्मणे यानी *गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवस्थापन, संवर्धन विषयी फायदे विषद केले व केंद्र शासनाच्या मत्स्य संवर्धन च्या विविध योजना* विषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांना मत्स्य संवर्धन व केव्हीके किर्लोस मार्फत *माहिती पत्रिकेचे वाटप* करण्यात आले व *नैसर्गिक शेती संबंधी ची पुस्तिका* ग्रामपंचायत ला भेट म्हणून देण्यात आली. कृषी सहाय्यक श्री अमोल इढोळे यांनी *कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांविषयी* उपस्थितांना माहिती दिली.
शेवटी आरे गावचे सरपंच ममता कदम व आत्मा समिती देवगड माजी अध्यक्ष महेश पाटोळे* यांनी या देश पातळीवर राबविण्यात येत असलेल्या अभियानास शुभेच्छा दिल्या व अशाच कार्यक्रमातून शेतकऱ्यांना शेतीतील विविध योजना, पिकाचे लागवड तंत्रज्ञान व कृषी पूरक उद्योग व्यवसायाची माहिती व लाभ मिळवून शेतकऱ्यास उन्नती करण्यास एक सुवर्ण संधी प्राप्त होत असते त्याचे आमचे शेतकरी अनुकरण करून प्रगती साधतील असे बोलून अध्यक्षीय भाषण केले.
यावेळी सरपंच ममता कदम,माजी सरपच महेश पाटोळे, कृषी विज्ञान केद्राचे डॉ. भास्कर काजरेकर, मत्स्य संवर्धन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ब्राम्हणे, सुयश राणे, बी. एम. लांबाडे, आत्माचे निकेतन राणे, अमोल इढोळे निखिल गोसावी, समाधान सपकाळ, रणजित ढाले, आदी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* श्री निकेतन राणे *व आभार प्रदर्शन* श्री अमोल इढोळे यांनी केले.










