खेड(प्रतिनिधी) खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. सदर कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष तथा खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंदार हळदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, दहावी बारावी उत्तीर्ण तसेच बी ए बी कॉम बी एस्सी. व इतर पदवी पदविका प्राप्त विद्यार्थी, मेडिकल व इंजिनिअरींग या सर्व क्षेत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून रिगल कॉलेज चिपळूणचे संस्थापक, अध्यक्ष संजय शिर्के
यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. यावेळी आय.सी.एस. कॉलेजची विद्यार्थीनी सानिया समीर जाधव हिला इटली येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. तसेच दहावीत १००% गुण मिळवून राज्यात प्रथम आलेल्या श्रेयस निलेश तांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबई मंडळाचे अध्यक्ष ॲड . दिपक हळदे साहेब उपस्थित होते. तसेच पंचायत समिती माजी सदस्य डॉ.गणेश मोरे, आर. पी. आय.चे कोकण विभागीय संघटक सुशांत सकपाळ, तिसे ग्रामपंचायतीच्या सरपंच निकीता जाधव, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा स्वाती जाधव, अपूर्वा पवार, रिना तांबे, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी केंद्रीय प्रमुख दिलीप सावंत, सूत्रसंचालन रविउदय जाधव, सत्यविजय मोरे, दिपक कांबळे यांनी केले तर आभार सचिव विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागुराम तांबे, चंद्रकांत कांबळे, सुरेश तांबे व संघटनेच्या सभासदांचे योगदान लाभले.













