पत्रकार वैशाली खानोलकर यांना पितृशोक 

महादेव खानोलकर यांचे दुःखद निधन

सावंतवाडी: कुडाळ तालुका पत्रकार संघाच्या महिला पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडील, कै. श्री. महादेव खानोलकर (मूळ रा. झाराप ता. कुडाळ, वय ८३) यांचे मंगळवारी (१० जून) सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (११ जून) सकाळी १० वाजता सावंतवाडीतील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेव खानोलकर हे औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ऑफिसर पदावरून निवृत्त झाले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महिला पत्रकार वैशाली खानोलकर यांचे ते वडील होते.