रत्नागिरी : भारतीय उद्योजकता विकास प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचे अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांगांसाठी अठरा दिवसाचा महिला उद्योजकता विकास कार्यक्रम उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील महिला उद्योजक सौ. मिलन कळंबटे. ॲग्री इंजिनियर. रत्नागिरी नगरपालिका नगरसेवक सोहेल मुकादम, रत्नागिरी नगरपालिका शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, शहर अभियान व्यवस्थापक अश्फाक गारदी, मेडिकल ऑफिसर डॉ. मुस्कान नाकाडे, भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा 18 दिवस बारा ते पाच ह्या वेळेमध्ये चालणार असून या कार्यक्रमांमध्ये उद्योजकता म्हणजे काय उद्योजक कोण आहे, उद्योगाचे प्रकार महिलांसाठी विविध उद्योगाच्या संधी उत्पादन ओळख आणि उत्पादन निवड प्रकल्प अहवाल मार्केटिंग मार्केट सर्वे व्यक्तिमत्व विकास संभाषण कौशल्य व्यवसायाला लागणारा मशनरी कच्चामाल यांचे व्यवस्थापन वित्तीय व्यवस्थापन प्राप्ती प्रेरणा प्रशिक्षण आदी विषयांचे सखोल ज्ञान मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मिलिंद दातार. बँक ऑफ इंडिया चे कन्सल्टंट बर्वे. डिजिटल मार्केटिंग साठी प्राध्यापक सुप्रभात सामंत. प्रकल्प अहवाल संतोष घडशी प्राध्यापक देसाई असे मान्यवर येऊन मार्गदर्शन करणार आहेत.













