चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (म.सा.प.) चिपळूण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, खर्चाचा लेखाजोखा, आगामी वर्षासाठी कार्यक्रमांचे नियोजन, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उपाययोजना, विविध स्पर्धा व व्याख्यानांचे आयोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. याशिवाय विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन कार्यकारिणीबाबतही निर्णय घेतला जाईल. सभेच्या अध्यक्षस्थानी शाखा अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे असतील. कार्याध्यक्ष सौ. अंजली बर्वे यांनी या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे











