केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

रत्नागिरी, : सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेचा थेट डीबीटीद्वारे लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांनी एन.बी.पोर्टल https://www.nbtribal.in वर ऑनलाईन अर्ज १५ जुलै २०२५ पर्यंत सादर करावेत.*

पोर्टलवर योजना निवड, ऑनलाईन अर्ज भरणे, 15 टक्के लाभार्थी हिस्सा, कागदपत्रे अपलोड, प्रत्येक टप्यावर अर्जाची माहिती एसएमएस संदेशद्वारे देणे आदी सुविधा आहेत. ऑफलाईन अर्ज प्रकल्प कार्यालय पेण येथे स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

सन 2025-26 या वर्षात वैयक्तिक लाभाच्या व सामूहिक लाभाच्या योजनांची तालुका निहाय लक्षांकासह व योजनेच्या लाभाच्या रक्कमेसह माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे. सदर योजनांपैकी कोणत्याही एका योजनेकरीता लाभार्थ्याने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि. रायगड (दुरध्वनी क्रमांक ०२१४३-२५२५१९) येथे संपर्क करावा.