दिवाणखवटीतील माजी सैनिक सीताराम कदम यांचे निधन

खेड(प्रतिनिधी)भारतीय सैन्यदलात अतुलनीय शौर्य गाजवत विविध पदके प्राप्त सेवानिवृत्त हवालदार व तालुक्यातील दिवाणखवटी-सातपानेवाडी येथील रहिवासी सीताराम रामभाऊ कदम (७५) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय सैन्यदलात सलग १८ वर्षे त्यांनी सेवा बजावली होती.

 

१९६२ आणि १९६५ च्या युद्धात सहभाग नोंदवत शौर्य गाजवले होते. १९७१च्या युद्धातही तोफखाना विभागात काम करून भारताला विजय प्राप्त करून देण्यात त्यांनी मौलिक कामगिरी बजावली होती. त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत विविध पदकांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

 

सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रस्थानी होते. गावच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान होते. दिवाणखवटी-सातपानेवाडीचे ते अध्यक्षही होते. मुंबई कुणबी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून समाजाला एकसंघ करत उभारी देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती.*