खेड(प्रतिनिधी)मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग ८ दिवस कोसळलेल्या पावसाने जून उजाडून देखील पाठ फिरवली होती मात्र शुक्रवार सांयकाळ पासून विजेच्या कडकडाटा सह शनिवारी देखील जोरदार हजेरी लावली पावसाच्या या कम बॅक ने मात्र शेतकरी वर्ग सुखावला आहे
मे च्या १९ तारखे पासून शहरा सह अवघ्या
तालुक्याला झोडपून काढले होते ऐन उन्हाळ्यात नदी नाले तुडुंब वाहू लागल्याने शेतकरी वर्गाची कामे खोळंबली होती मात्र त्यानंतर जून उजाडून देखील पावसाने दडी मारली होती मात्र शुक्रवार पासून पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे
शनिवारी सकाळ पासून ऊन होते मात्र दुपारी ३.३० च्या दरम्यान पावसाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने अंशतः जन जीवन विस्कळीत झाले सांयकाळी उशिरा पर्यत पावसाचा जोर मात्र कायम राहिला होता











