रत्नागिरी:
इयत्ता पहिली पासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या यांच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यस्थापनांना निवेदन देण्यात आले .
यावेळी विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर, सोम पिलनकर, रोहन शेलार , अँड. माधवी पालकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाचे पत्र रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूल, सॅक्रेड कॉन्व्हेन्ट हायस्कूल , विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आदी शहरातील प्रमुख शाळांना निवेदन देण्यात आले.











