रत्नागिरी :
भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी शहर कार्यालयात भारत माता पूत्र, भारतीय जनसंघाचे संस्थापक, आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रनिर्मितीतल्या योगदानाचा गौरव करण्यात आला व त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान, एक निशान’ या घोषणेद्वारे देशाच्या अखंडतेसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्ती यांचा आदर्श ठेवत भारतीय जनता पार्टी त्याच विचारांवर कार्य करत आहे असे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सांगितले.












