चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चिपळूण न.प.मार्फत दि. १५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष डॉ. रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, उपसभापती पल्लवी उर्फ राणी महाडिक, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती हर्षाली पवार, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती नीलम जाधव, नगरसेविका वैशाली कदम, वैशाली निमकर, कांचन शिंदे, मिसबा नाखुदा, स्वीकृत नगरसेविका शितल रानडे, नगरसेवक अजय भालेकर आणि उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या वतीने सर्व अंगणवाडी केंद्रांवर जाऊन अंगणवाडी सेविका यांना शाल, फुलांचे रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व बालकांना पोषणयुक्त फळे वाटप करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने खालील अंगणवाडी सेविका/मदतनीस यांचा यथोचित सन्मान करण्यात आला: श्रीम.मीरा जुवळे, अमरीन रेहान खतीब, अश्विनी अशोक जोगळे, श्रद्धा सुनील नानीस्कर, शितल श्याम नवरत, मयुरी महेश पवार, प्रणिता उदय कपडेकर, स्वरा स्वप्नील जाधव. या उपक्रमाचे नियोजन उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी केले. सेवा तत्त्वावरील उद्यान तांत्रिक कार्यकारी सुरज सकपाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच सेवा तत्त्वावरील डेटा ऑपरेटर सायली खेतले, सेजल महाडिक आणि उद्यान विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व नियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













