राजापूर l प्रतिनिधी : मुळचे लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कोसुंबळे येथील रहिवाशी असलेले व व्यवसायासाठी विरार येथे स्थायिक झालेले विजय विष्णू सुर्वे (६६) यांचे सोमवारी २३ जून रोजी मुंबईत रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कोसुंबळे येथील रहिवाशी असलेले विजय सुर्वे हे व्यवसायासाठी मुंबईत स्थायिक झाले होते. काही काळ अंधेरी मध्ये व त्यानंतर ते विरार येथे वास्तव्यास होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर मुंबईत नायर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतनाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालावली.
एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या माध्यमातुन त्यांनी मुंबई व परिसरात काम केले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक जावई, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.











