रत्नागिरी :
कुवारबाव ग्रामपंचायत कार्यालय समोरील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उत्कर्षनगर कुवारबाव येथे भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष संदीप उर्फ बावशेठ नाचणकर जिल्हा सरचिटणीस श्री सतेज नलावडे तसेच जिल्हा उपाध्यक्षा सौ अनुश्री आपटे महिला मोर्चा आघाडी दक्षिण रत्नागिरी व तालुका अध्यक्षा सौ प्रियल जोशी सरचिटणीस सौ अनुष्का शेलार व कोषाध्यक्ष सौ आस्था गराते व शक्ती केंद्रप्रमुख श्री दीपक आपटे तसेच सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर खानविलकर सर जेष्ठ मार्गदर्शक सौ शुभांगी भावे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिवलकर मॅडम यांनी व्यासपीठावरील मान्य वारांच स्वागत करून कार्यक्रम सुरू झाला यामध्ये श्री सतेज नलावडे व श्री प्रभाकर खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षकांना दामले विद्यालयाच्या धर्तीवर आपल्या ही शाळेचे नाव झाले पाहिजे त्यासाठी सतत प्रयत्न शील राहा व आमची ही गरज लागली तर कायम आम्ही सोबत असू असे आश्वासन देऊन शाळेतील १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले व कार्यक्रमाची शाळेतील शिक्षकांनी आभार मानून सांगता केली










