एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी प्रचंड गर्दी

कणकवली :* एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली महाविद्यालयात इंजिनिअरिंग प्रवेश २०२५-२६ करिता सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रकिया हि २८ जनू २०२५ पासून सुरू झाली आहे हि ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया ८ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे. या रजिस्ट्रेशनसाठी एस.एस.पी.एम. कॉलेजच्या एस्सी सेंटरवर विद्यार्थी व पालकांनी प्रचंड गर्दी केली. *२६* वर्षापासून एस.एस.पी.एम. कॉलेज कणकवली येथे कार्यरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा एस.एस.पी.एम. कॉलेज कणकवली कडे असल्याचे दिसून येते.

 

एस.एस.पी.एम. कॉलेजने शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला *नॅक बी+ ग्रेड* प्राप्त केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा सर्वाधिक ओढा एस.एस.पी.एम. कॉलेज कडे असल्याचे दिसून येत आहे.

 

एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे *संस्थापक सन्मा. नारायणरावजी राणे साहेब, अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे मॅडम, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणेसाहेब व सचिव सन्मा. नितेशजी राणेसाहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर* यांच्या नेतृत्वाखालील उच्च शिक्षित प्राध्यापक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत. एस.एस.पी.एम. कॉलेज मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अचूक अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. हि समिती नियोजनबद्धपणे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडत आहेत. या प्रक्रियेला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.

 

अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास खालील प्राध्यापकांशी संपर्क साधावा :

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी : प्रा. सचिन मेस्त्री (७५८८५०५२८५), प्रा. इम्रान पटेल (९७३०८०२०४६)*

*द्वितीय वर्ष प्रवेशासाठी : प्रा. वैभव माईणकर (९०४९८१३८७०), प्रा. अजित गोसावी (९४२०८२२४१५)* या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एस.एस.पी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. डी. एस. बाडकर* यांनी केले आहे.