रविवारी रत्नागिरी येथे आषाढी वारी

जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी सामील व्हावे; आयोजक सकल हिंदू समाजातर्फे आवाहन

रत्नागिरी :
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून रविवार दिनांक ६ जुलै रोजी आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या विठ्ठलभक्ताना पंढरपूर पर्यंत वारीला जात येत नाही त्यांची सेवा विठ्ठलचरणी रुजू व्हावी या सुहेतूने गेली काही वर्ष शक्तिमंदिर ते भक्तीमंदिर या संकल्पनेने आषाढी वारीचे आयोजन केले जात आहे.

शक्तिमंदिर म्हणजेच रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध मारुती मंदिर तर भक्ती मंदिर म्हणजेच प्रति पंढरपूर समजले जाणारे रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर होय.

या वारीची सुरुवात रविवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ६:३० वाजता मारुती मंदिर इथून होईल तर सांगता विठ्ठल मंदिर इथे होईल. या वारीदरम्यान विठ्ठलभक्ताना रिंगणाचा आनंद देखील घेता येईल.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त विठ्ठलभक्तांनी या वारीमध्ये पारंपारिक वेषात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या ॲड. रुची महाजनी यांनी केले आहे.