राजापूर तालुका महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत राजापूर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर घडशी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ करीता नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष पदी शंकर घडशी सहाय्यक महसूल अधिकारी, कार्याध्यक्षपदी विकास पिठलेकर- सहाय्यक महसूल अधिकारी, बाजीराव पाटील सहाय्यक महसूल अधिकारी, संघटकपदी दिपक गवंडी वाहनचालक, सरचिटणीसपदी मकरंद प्रभूलकर महसूल सहायक, खजिनदारपदी विशाल जाधव महसूल सहायक, चिटणीसपदी मंगेश पाटणकर महसूल सहायक, प्रसिद्धी प्रमुख पदी प्रविण कांबळे महसूल सहायक चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून अनंत मोरे शिपाई यांची निवड करण्यात आली.

तसेच सल्लागार म्हणून दादासाहेब थोरात मंडळ अधिकारी कोंडये तर्फे सौंदळ यांची निवड करण्यात आली.

घडशी हे सन २००९ पासून महसूल संघटनेत पदाधिकारी म्हणून विविध पदांवर कार्यरत आहेत. महसूल कर्मचारी यांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी घडशी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सुनील कीर तसेच राजापूर तालुक्यातील अनेकानी अभिनंदन केले आहे. कार्यकारिणीचे निवड प्रसंगी जिल्हा प्रतिनिधी मंगेश परांजपे उपास्थित होते.