आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त पुरे बुद्रुक येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खेड : खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक गावात आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक पेड माय के नाम हा विशेष वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक मा. डॉ. सुधीरजी गिम्हवणेकर साहेब, खेड तालुका बँकेचे उपसरव्यवस्थापक मा. सुनीलजी निकम साहेब, श्रीदेवी झोलाई केदार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन सचिनजी पवार, पुरे बुद्रुक गावाचे पोलीस पाटील मा. सुनीलजी पवार, व्हाइस चेअरमन मा. प्रकाश पवार, शिंगरी गावचे पोलीस पाटील मा. कैलास कदम, मा. श्री भरत पवार, मा. श्री सहदेव कदम, मा. श्री बबन पवार, मा. श्री सचिन पवार, मा. श्री चंद्रकांत पवार, कोरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव मा. सुनीलजी धामणस्कर, कळबणी सोसायटीचे सेक्रेटरी मा. मंगेश महाडिक, पुरे बुद्रुक सोसायटीचे सचिव मा. राजेंद्र पवार, प्राथमिक शाळा पुणे बुद्रुकचे मुख्याध्यापक, आरोग्य उपकेंद्र पुरे बुद्रुकचे श्री दीपकजी जोंधळे साहेब, मा. सौ. अस्मिता मोरे (सीएचओ), मा. सौ. गवळे मॅडम, तसेच मा. योगेशजी मेस्त्री, मा. संतोष पवार, मा. अक्षय महाडिक आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

या वृक्षारोपण उपक्रमात शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.