वैभव खेडेकर यांचे खेड भाजपाकडून भव्य स्वागत

खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कोकणचं वैभव सन्मान प्राप्त श्री. वैभव खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केल्यानंतर गुरुवार 16 ऑक्टोबर roji खेड तालुका भाजपच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या पक्षप्रवेशानंतर खेड शहरात हा सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला तालुका व शहरातील असंख्य भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. खेड भाजपकडून खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री. ऋषिकेश मोरे यांच्यासह पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने वैभव खेडेकर यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला खेड तालुक्यात नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आपल्या मनोगतात श्री. वैभव खेडेकर म्हणाले, “भारतीय जनता पक्ष विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो. खेड तालुका आणि कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी पक्षासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.” त्यांच्या या वक्तव्याला कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.