माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम

गौरव पोंक्षे l माखजन :

संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक वारकरी सांप्रदायातील वेशभूषा करून दिंडी काढण्यात आली.दिंडी वेळी अभंग गायन करण्यात आले तर अभंग गायनाची स्पर्धा झाली.फुगड्या घालून आषाढी दिंडी मध्ये रंगत आणण्यात आली.

विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..विठोबा रखुमाय च्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडीत पांडुरंगाचा जयघोष केला.या दिंडीत विद्यार्थ्यांसंमवेत शिक्षकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला.निरज लघाटे या विद्यार्थ्यांने अभंग गायनावेळी उत्तम तबला साथ केली .यावेळी पालक,शिक्षक उपस्थित होते.