कोल्हापूरला हलवले
रत्नागिरी ः प्रतिनिधी
लांजा येथील फर्निचर दुकानामध्ये सुतार काम करत असताना कामगाराच्या हाताला लोखंडी कटर मशिन लागून तो गंभिर जखमी झाला. ही घटना शुक्रवार 4 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.
नंदकुमार रविंद्र पांचाळ असे जखमी कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो लांजा येथील चौधरी फर्निचरमध्ये सुतार काम करत होता. त्यावेळी तेथील लोखंडी कटर मशिनचे पाते त्यांच्या डाव्या हाताच्या पंज्याला लागून गंभिर दुखापत झाली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात नेउन नंतर रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.











