खेड । प्रतिनिधी: भडगाव – येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. 5 वी तील 50 पैकी 20 विद्यार्थी गुणवत्ताधारक त्यापैकी 02 विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामध्ये इ. 5 वी तील आयुष बाबासाहेब बनसोड राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 6 वा तर श्रीहर्ष महादेव वाघमोडे राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 8 वा आला आहे. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 18 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. इ. 8 वी तील 46 पैकी 36 विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत. रत्नागिरी जिल्हयातून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीसाठी प्रथम 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यामध्ये 08 विद्यार्थी ज्ञानदीपचेच आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तसेच राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये निवडले जातात. त्यामध्ये इ. 8 वी तील कु. राजनंदिनी संदीप सावंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 7 वी आली आहे. तर अर्णव राजकुमार मगदूम व तेज राजेश भागणे हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 14 वे, अथर्व सतीश जागडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 16 वा आला आहे. कैवल्य संजय कुलकर्णी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 6 वा, सुमित सुग्रीव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 7 वा, स्पर्शिका सोनेराव पांढरे राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 8 वी तर यश गुरुदास पंदेरे राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 9 वा आला आहे. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 27 विद्यार्थी व तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये 01 विद्यार्थिनी यशस्वी झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इ. 5 वी चा शिष्यवृत्ती निकाल 23.90% लागला असून ज्ञानदीपचा निकाल 84.00% लागला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इ. 8 वी चा शिष्यवृत्ती निकाल 19.30% लागला असून ज्ञानदीपचा निकाल 89.13% लागला आहे.
आज अखेर ज्ञानदीपचे इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 425 विद्यार्थी गुणवत्ता धारक आहेत व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 571 विद्यार्थी गुणवत्ता धारक आहेत. प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव व उत्तम मार्गदर्शन तसेच विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक शांतीलाल आव्हाड व प्रज्ञा मोरे व विषय शिक्षक विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, अंजली जाधव, राजेंद्र नाटेकर, दिलीप मोहिते, विनोद टेंबे, रामचंद्र भिंगारे, महादेव वाघमोडे, रागिणी जामकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्रशालेचे प्राचार्य राजकुमार मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.










