शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडून शब्दपूर्ती
चिरणी मुंबई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले ना. रामदास कदम यांचे आभार
चिपळूण | प्रतिनिधी : चिरणी (ता. खेड) गावातील विकासकामांसाठी माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी २१ लाखांचा निधी तात्काळ मंजूर करून दिल्याबद्दल चिरणी मुंबई मंडळाच्या वतीने शिवसेना नेते ना. रामदास कदम यांची मुंबई कांदिवली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. या विकास निधीबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
शिवसेना खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण याच्यासह येथील तरुण कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य योगेश व जितेंद्र आंब्रे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे गटातील गावभेट दौऱ्यादरम्यान चिरणी येथे देखील ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली. यावेळी गावाच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी योगेश आंब्रे व जितेंद्र आंब्रे यांच्यासह ग्रामस्थांनी केली. यानुसार नेते रामदास कदम यांनी काही महिन्यातच गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये चिरणी बस स्टॉप ते खालचीवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख रुपये), चिरणी विठ्ठलवाडी रस्ता डांबरीकरण करणे (८ लाख), चिरणी विठ्ठलवाडी ते राजवाडा रस्ता डांबरीकरण करणे (८ लाख) या कामांचा समावेश आहे. याबद्दल चिरणी मुंबई मंडळाने शिवसेना नेते रामदास कदम यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, पंधरागाव मुंबई संपर्कप्रमुख दत्ता मोरे, विभागीय विभाग प्रमुख सुभाष सकपाळ, मनोहर सकपाळ, प्रभाकर पालांडे, लोटे गण प्रमुख योगेश भि. आंब्रे, संजय राम आंब्रे, मधुकरराव आंब्रे, अशोक आंब्रे, महेश आंब्रे, कॅप्टन लहू आंब्रे, संतोष आंब्रे, प्रदीप आंब्रे, अमित आंब्रे, भिकाजीं आंब्रे, श्रीकांत आंब्रे, अनिल आंब्रे, संजय शांताराम आंब्रे आदी उपस्थित होते. तर उर्वरित कामांसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे नेते रामदास कदम यांनी ग्वाही दिली आहे.











