Pune : खंडाळा घाटात टँकर पेटला, दोघे होरपळले, एकाचा मृत्यू

दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग लागली असून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून या घटनेत दोघे होरपळले, एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहतूक थांबवल्यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अद्याप हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीचा भडका उडाल्याने द्रुतगती महामार्ग आणि त्याखालून जाणारा महामार्ग या दोन्ही महामार्गावर या आगीच्या झळा पोहचत आहेत.