शिरगांव,(प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील साळशी येथे बुधवार १६ जुलै कर्क संक्रात दिवशी पारंपरिक भावई उत्सव साजरा करण्यात येणार आहे.शिवकालीन परंपरेशी नाते सांगणारा हा उत्सव गावकरी आजही निष्ठेने, श्रद्धेने आणि एकजुटीने साजरा करतात.
या उत्सवापासून इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते.













