शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना अध्यक्ष अनिल पडवळ यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना अध्यक्ष अनिल चंद्रकांत पडवळ यांच्या स्वाक्षरीने किसन मांजरेकर यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना अध्यक्ष अनिल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आपली महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेवून कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
किसन मांजरेकर यांनी यापूर्वी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे. आता महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.











