चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी
स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात केले दाखल
आजगाव येथे दोन एसटींची समोरासमोर धडक
चालक वाहकांसह ३४ प्रवासी जखमी
स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात केले दाखल
सावंतवाडी | प्रतिनिधी: आजगाव येथील डीएड कॉलेजजवळच्या वळणावर आज दुपारी सुमारे ३:३० वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसच्या चालक व वाहकांसह ३४ प्रवासी जखमी झाले. जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी उपलब्ध होईल त्या वाहनाने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजीकडे जाणारी (एमएच २० बीएल ३९३४) आणि सावंतवाडीहून शिरोड्याकडे जाणारी (एमएच १४ बीटी २०१२) या दोन एसटी बसेसमध्ये हा अपघात घडला. अपघातानंतर दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही बसचे चालक व वाहक या अपघातात जखमी झाले असून, एका चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात मोठा अडथळा येत होता, तरीही स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करत जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना रिक्षा आणि उपलब्ध असलेल्या इतर वाहनांच्या मदतीने मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवाडकर, अशोक रेवाडकर, गणेश रेवाडकर, आनंद कळसुलकर, शुभम परब, सूर्या पांढरे, सुनील आजगावकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी या मदतकार्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, अपघातस्थळी एसटीचे अधिकारी किंवा पोलीस उशिरापर्यंत दाखल झाले नव्हते. स्थानिकांनीच पुढाकार घेऊन जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून दिली.
सावंतवाडी शिरोडा एस टी बसचे चालक एस एम दर्शन, वाहक आर एस कांबळी वेंगुर्ले पणजी गाडी चालक एम के दाभोलकर, वाहक पी एस जाधव तर प्रवासी दशरथ सीताराम राऊळ ( वय ७५, रा. सातार्डा ) , सुमित्रा दशरथ राऊळ ( ६८, रा. सातार्डा ) या सहा जखमींवर मळेवाड आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर शिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात देखील काही जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यात शेवंती परशुराम पारील (५३, रा. आजरा ), नंदा नितिन कवठणकर (४२, रा. कवठणी ) नमिता संकल्प शिरोडकर ( २८, रा. शिरोडा ), लुकुमान जमिल शेख (२३, रा.शिरोडा ), निदा मुजावर (१५, रा. शिरोडा ) संगिता संजय सावंत (४९, रा. रेडी ), याकुब निरुद्दीन शेख (४८, रा. शिरोडा), मनोज कृष्णा दाभोलकर ( ४८, रा. दाभोली ), नाझिया नईम मुजावर ( ४२, रा. शिरोडा) निधी अशोक नाईक (१९, रा. आरवली ), सोनाली नार्वेकर (२४, रा.वेंगुर्ला ), प्रज्योती पांडुरंग मांजरेकर ( २४, वास्को ) संचाली नवसो गावडे (१७, आसोली ), नंदिनी आनंद कुमठेकर ( ३२,कारवार ), वासुदेव युगानंद पांगम ( २५, वेंगुर्ला ), सुलताना बशीर थानगे (२९, शिरोडा) दर्शना दशरथ मुळीक ( ५३,मळेवाड) प्रमिला प्रभाकर मुळीक (६९,सातार्डा ) , युक्ता ज्ञानदेव तांडेल ( २२, रा. उभादांडा ) रुणाली शरद कळंगुटकर ( १८, रा. आसोली ) विष्णु विठ्ठल तुळसकर ( ६५, रा. सातार्डा ) शेवंती परशुराम पाटिल ( ५३, रा.आजरा ) , वासुदेव युगानंद पांगम ( २५,वेंगुर्ला) सोनाली बाबू नार्वेकर (२५, आडेली, वेंगुर्ला,) सुलताना बशीर थानगे ( २९, शिरोडा) , नंदा नितीन -कवठणकर ( ४०, रा.कवठणी ) दर्शना दशरथ मुळीक ( ५३, रा. मळेवाड ) अशी शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे आहेत. यातील काही जखमींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर सद्यस्थितीत इतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फांची मोठी रांग लागली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यात उशीर झाल्याने या ट्राफिक जामचा फटका अनेक वाहनधारकांना बसला. मात्र स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर काही वाहनधारकांनी वाहने सुरळीत करण्यास मदत केली. सायंकाळी उशिरा वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामे नंतर दोन्ही अपघात जास्त एसटी बाजूला करण्यात आले. जखमींना मदत संदर्भात अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत कोणतीही घोषणा केली नव्हती.













