देवगड नळपाणी योजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

देवगड — महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळपाणी योजनेच्या पाईपलाइन दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता वेळवाडी सडा येथील साठवण टाकीजवळ करण्यात येत आहे. हे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

 

याच दिवशी भारतीय जनता पक्ष देवगड मंडळाच्या वतीने जामसंडे येथील टिळक स्मारक येथे सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या दोन्ही उपक्रमांमध्ये देवगड तालुक्यातील नागरिक, सेवाभावी संस्था, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवगड तालुका मंडल अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.