रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी ७९.७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात चांगला पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात ९५.६६ मिमी इतका नोंदवला गेला आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेला पाऊस (मिमीमध्ये) खालीलप्रमाणे:
* मंडणगड: ६५.७५
* खेड: ७३.७१
* दापोली: ८२.००
* चिपळूण: ५५.८९
* गुहागर: ८८.४०
* संगमेश्वर: ८७.५८
* रत्नागिरी: ९५.६६
* लांजा: ९०.६०
* राजापूर: ७८.५०
आज जिल्ह्यात एकूण ७१८.०९ मिमी पाऊस झाला आहे. पावसाच्या या प्रमाणामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.











