मुंढर (वार्ताहर)गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गौरी विवेक वैद्य हिने सी ए परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
गौरी विवेक वैद्य ही डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थिबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागर या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे.तिच्या या यशाबद्दल विद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला डॉ.तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष तसेच डॉ.विनय नातू उपस्थित होते .विद्यालायाची विद्यार्थिनी सी ए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाच्या वतीने तिचे झांज पथक वाजवून स्वागत करण्यात आले.त्यानंतर डॉ.विनय नातू यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गौरी वैद्य हिने विद्यार्थ्यांना आपल्या यशाचा मार्ग कसा निवडावा याचे मार्गदर्शन केले.गौरी वैद्य आणि तिच्या पालकांचे ही विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ.विनय नातू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे जावेत यासाठी प्रतिष्ठान सर्वोतोपरी सहकार्य करेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उदय दामले तर आभार दिपाली कांबळे यांनी व्यक्त केले.










