माझी वसुंधरा मध्ये खामशेत गवळवाडीचा उस्फुर्त प्रतिसाद

गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायत येथे पेवे गवळीवाडीतील स्थानिक व मुंबईकर गोपाळकृष्ण विकास मंडळाने ग्रामपंचायतने प्रस्तावित केलेल्या माझी वसुंधरा अभियान” मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यामध्ये स्थानिक तसेच मुंबईतील व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी यांनी या अभियानमध्ये भाग घेऊन खामशेत ग्रामपंचायतला मोलाचे सहकार्य केले. ज्यांनी या अभियानमध्ये उस्फुर्त भाग घेतला त्या सर्वांचा मुंबई येथील श्रीकृष्ण हॉल, दादर, नायगांव येथे नुकताच सत्कार करण्यात आला.