गुहागरातील जि.प.शाळांमध्ये साहित्य वाटप

स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानचा उपक्रम

गुहागर (प्रतिनिधी) – स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान आणि भूमिपुत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नुकताच गुहागर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा उभळे विराटवाडी येथील १५ विद्यार्थ्यांना आणि जिल्हा परिषद शाळा पालपेणे येथील १०७ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रदीपजी खेतले आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सचिव मा. संदीपजी खैर साहेब व समाजसेवक उमेशजी खैर साहेब यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत रघुनाथ पोस्टुरे, संतोष पोस्टुरे, दिनेेश झगडे, मितेश घडशी, काशिराम पाष्टे, विठ्ठल शिगवण, वसंत खेडेकर, अविनाश माटल, तेजस फटकरे, महेश बोरले व कुणाल खाकम या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.