रत्नागिरी । प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथील शाळेजवळ पुलावरून गॅस टँकर खाली कोसळला.
घटना आज रात्री ११:१५ च्या सुमारास घडली.
गॅस लिकेज झाल्याची प्राथमिक माहिती.
स्फोटाचा धोका असल्यामुळे सतर्कता बाळगली जात असून यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद.
पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल.
नागरिकांनी त्या परिसरात ना जाण्याचे आवाहन.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.













